संजय राऊत मूर्ख अन् बेताल, अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर विरोधकांच्या टीकेवर संजय शिरसाट भडकले
बदलापूर संस्था चालक यांच्यासोबत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे संबंध आहेत. त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेंची हत्या करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. यावर संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. बघा काय म्हणाले संजय शिरसाट?
अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर हा पोलिसांवर हल्ला केल्यामुळे झाला. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणं हे प्रकार म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे, असे म्हणत संजय शिरसाट यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. दरम्यान, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर करण्यात आला. यानंतर विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. बदलापूर प्रकरणात मुख्य आरोपी आणि संस्था चालकाला वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा ठरवून केला गेला, असा आरोप संजय राऊत यांनी सरकारवर केला. संजय राऊत यांच्या टीकेवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, मुख्य आरोपी कोण? बलात्कारी आरोपी कोण? काहीतरी ताळमेळ लागला पाहिजे. बदलापूर येथील त्या संस्थेवर तो कामाला होता हे जगजाहीर आहे. या प्रकरणासंदर्भात पोलीस कारवाई करत आहे. या आरोपीने केले कृत्य आणि त्याच्याकडे अनेक व्हिडीओ सापडले होते यामध्ये कोण सामील आहे हे तपासातून समोर येईल. परंतू फाउंडर कोण आहे.? तो फाउंडर जर शंभर वर्षाचा असेल तर त्याच्यावर गुन्हा दाखल करा म्हणणं किती योग्य आहे… कायदा सर्वांसाठी समान आहे. पण जो आरोपी नाही त्याला आरोपी बनवण्यासाठी कायदा नाहीये. कायद्याचा वापर करताना या गोष्टी ध्यानात ठेवल्या पाहिजे, असंही संजय शिरसाट म्हणाले. संजय राऊत मूर्ख माणूस आहे. संस्थाचालक कोण कसला कुठला काय घेणं देणं. महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीच्या 90% संस्था त्यात काही घडलं तर शरद पवारांना कारणीभूत धरायचं का? चव्हाण यांना कारणीभूत धरायचं का? असं नसतं संस्था एखाद्याच्या नावावर असली तर त्यांना आरोपी करता येत नाही, असे म्हणत संजय राऊत यांना संजय शिरसाट यांनी फटकारलंय.