‘तेव्हा फडणवीस समोर आले की डोळ्यात पाणी यायचं’, शहाजीबापू पाटील यांनी काय सांगितला किस्सा
VIDEO | उद्धव ठाकरे यांना आमची भूमिका एक दिवस नक्की पटेल, आमदार शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
सोलापूर : राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्याला अनेक आमदारांचा विरोध होता. परंतु उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असल्याने अनेक जण तयार झाले. परंतु महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांत शिवसेनेच्या आमदारांना डावलले जाऊ लागले. त्यांना निधी दिला जात नव्हता. यामुळे राज्यातील सत्ता परिवर्तन हे आमदारांनीच केले. त्यामध्ये आपणही सहभागी असल्याचा दावा शिंदेच्या शिवसेनेतील आमदार शहाजीबापू पाटील यांनी केला. हे सांगताना त्यांनी एक किस्सा देखील सांगितला. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस समोर आल्यावर आम्हाला गद्दारी केल्यासारखे वाटायचे. त्यामुळे फडणवीस साहेबांना डोळ्यासमोर पाहिल्यावर डोळ्यातून पाणी यायचे, असे मत शिंदे गटातील आमदार शहाजी बापू यांनी व्यक्त केले. विधान भवनात विरोधी पक्ष नेते म्हणून फडणवीस यांच्यांकडे पाहिल्यावर डोळ्यातून पाणी येत होते. भाजपशी आम्ही गद्दारी केल्यासारखे वाटत होते, असे शहाजीबापू म्हणाले.