अरविंद सावंत यांच्या अडचणी वाढणार? शायना एन सी यांची पोलिसात तक्रार, प्रकरण काय?

| Updated on: Nov 01, 2024 | 5:34 PM

“बाहेरचा माल चालणार नाही. इथे इथलाच माल चालणार” असं अरविंद सावंत म्हणाले. या टीकेवरून मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार शायना एनसी यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर अरविंद सावंतांविरोधात नागपाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

ठाकरे गट शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात नागपाडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांनी अरविंद सावंत यांच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे. शायना एन. सी. यांच्याविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. शायना एन. सी. यांच्यासोबत अरविंद सावंत यांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल करताना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्या देखील उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्याबाहेर घोषणाबाजी केली. इतकंच नाहीतर शायना एन. सी यांच्याबद्दल इम्पोर्टेड माल असा शब्द वापरल्याबद्दल अरविंद सावंत यांनी माफी मागावी अशी मागणी शायना एन. सी यांच्यासह या महिलांकडून करण्यात आली. अरविंद सावंत यांनी शायना एन. सी. यांच्याबद्दल संबंधित वक्तव्य केलं. “त्यांची अवस्था बघा. ते आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि दुसऱ्या पक्षात चालल्या गेल्या. इंपोर्टेड माल इथे काम करत नाही. इथे फक्त ओरिजनल माल काम करतो”, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं होतं.

Published on: Nov 01, 2024 05:34 PM
Panchavati Express Anniversary : पंचवटी एक्सप्रेसचा 49 वा वाढदिवस जल्लोषात, भल्या पहाटे केक कापून जंगी सेलिब्रेशन
शायना एन.सी यांच्या ‘त्या’ आरोपानंतर अजितदादा म्हणाले, ‘माझ्यासकट सगळ्यांना आवाहन की..’