काऊंटडाऊन सुरू झालंय, शीतल म्हात्रे यांनी कुणाला दिला सूचक इशारा

| Updated on: Mar 17, 2023 | 8:31 AM

VIDEO | आदित्य ठाकरे यांनी नौटंकी बंद करून जनतेला काम करून दाखवावी, शिवसेनेतील नेत्यानं केली टीका

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या वरळी विधानसभा मतदार संघातील माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला तर यावेळी सदा सरवणकर, शीतल म्हात्रे हे देखील हजर होते. वरळी मतदार संघातील तीनही नगरसेवकांना शिंदे गटाने गळाला लावून आदित्य ठाकरे यांना घेरण्याचा प्रयत्न केला असल्याचेही चर्चा दबक्या आवाजात होत आहे. यावर शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, असे पक्ष प्रवेश करून त्यांना घेरण्याची काही आवश्यकता नाही. आज A+ वरळी म्हणून आरोडा ओरड करत होते, आज त्याच वरळीत तीन आमदार आहेत. असे असतानाही तेच आमदार सांगताय कोणतीही कामं या मतदार संघात झाली नाही. तर कोणती कामं केली जाताय, असा सवाल शीतल म्हात्रे यांनी उपस्थित केला आहे. यासह त्यांनी खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असे म्हणत निशाणा देखील साधला. तर येणाऱ्या काळात असे अनेक जण शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, त्यामुळे आता काऊंटडाऊन सुरू झालंय असे म्हणत शीतल म्हात्रे यांनी ठाकरे गटासह आदित्य ठाकरे यांनी सूचक इशारा दिला आहे.

Published on: Mar 17, 2023 08:31 AM
Super Fast News | 31 मे पर्यंत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे
डोंबिवलीत पुन्हा फेरीवाल्यांची अरेरावी, रुग्णवाहिका चालकास बेदम मारहाण; बघा काय नेमकं काय घडलं?