‘आम्ही पाप धुण्यासाठी जातोय मग तुम्ही कशासाठी गेले होते?’, संजय राऊतांवर हल्लाबोल

| Updated on: Apr 08, 2023 | 7:29 PM

VIDEO | संजय राऊत यांना मानसिक आजार, त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही, शिवसेनेच्या नेत्यानं लगावला खोचक टोला

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते हे सर्व अयोध्येच्या दौऱ्याकरता रवाना झाले आहेत. अशातच या शिवसेनेच्या नेत्यावर विरोधकांनी टीका करत जोरदार हल्लाबोल केला आहे. यावर बोलताना शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, टीका करणाऱ्यांना दिवस जात नाही त्यामुळे ते टीका करतच राहणार, एकेकाळी ते ही गाजावाजा करून अयोध्येला आले होते. परंतु आता त्यांच्या भूमिका बदलल्यामुळे त्यांना अयोध्येला जाणं श्रेयस्कर वाटत नसल्याचे म्हणत शीतल म्हात्रे यांनी निशाणा साधला. दरम्यान शिवसेनेचे सर्व नेते त्यांची पापं धुण्यासाठी जात आहेत त्यांनी श्रीराम पावणार नाही, या टीकेला उत्तर देताना त्या म्हणाल्या, ‘आम्ही पाप धुण्यासाठी जातोय मग तुम्ही कशासाठी गेले होते? आपण काय केले आहे ते विसरू नये. हिंदू नागरिकांच्या भावनांचा हा अपमान आहे. तर संजय राऊत यांना मानसिक आजार, त्यांच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज नाही. ‘, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

Published on: Apr 08, 2023 07:29 PM
एकनाथ शिंदे अयोध्येतील राम मंदिराला ‘इतक्या’ तोळ्याचं धनुष्यबाण देणार, कुणी केला नवस
गुलाबराव पाटील यांचं संजय राऊत यांना एका वाक्यात प्रत्युत्तर, म्हणाले, ‘ आमच्याकडून जी मतं घेतली ती..’