‘त्यांची हल्ला करण्याची तयारी…’, शीतल म्हात्रे यांनी सांगितली आपबिती
VIDEO | शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी आज दादर पोलीस ठाण्यात 'त्या' घडलेल्या प्रकरणाबाबत नोंदविला जबाब, काय म्हणाल्या बघा
मुंबई : शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे या त्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून चांगल्याच चर्चेत आहेत. याप्रकरणी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून नेते मंडळी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसताय. अशातच दोन संशयितांनी आपला पाठलाग केला असल्याचा खळबळजनक दावा केला असून याप्रकरणी त्यांनी सहपोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे तक्रार नोंदविली. दरम्यान आज दादर येथील पोलीस ठाण्यात शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्यासोबत शीतल म्हात्रे हजर होत्या, यावेळी त्यांनी दोन अज्ञात इसमांविरोधात तक्रार दाखल करत पोलिसांकडे जबाब नोंदवला आणि प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. माध्यमांशी बोलतांना शीतल म्हात्रे यांनी आपबिती सांगितली बघा काय म्हणाल्या….
Published on: Mar 14, 2023 07:23 PM