Sushma Andhare : 6 फूट उंच, गोल गंध, ‘जय श्रीराम’च्या घोषणा अन् जीवाला धोका, रात्री 3.30 वाजता नागपूरात सुषमा अंधारेंसोबत काय झालं?

| Updated on: Dec 17, 2024 | 12:04 PM

अनोळखी व्यक्तीने धमकी दिल्याचे म्हणत सुषमा अंधारे यांनी ट्वीट केलंय. नागपूर विमानतळाजवळ गाडीतून जाणाऱ्या एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. अनोळखी व्यक्तीने धमकी दिल्याचे म्हणत सुषमा अंधारे यांनी ट्वीट केलंय. नागपूर विमानतळाजवळ गाडीतून जाणाऱ्या एका व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे तर देवेंद्र फडणवीस यांनी सीसीटीव्ही तपासून वस्तुस्थिती पाहावी, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांना त्यांच्या ट्वीटमध्ये असं म्हटलं, ‘रात्री 3 वाजून 36 मिनिटांनी नागपूर विमानतळावर विचित्र घटना घडली. साधारण 6 फूट उंचीचा गोल आकाराचा गंध लावलेला, समोरून अर्धे टक्कल असणारा माणूस बोलण्याचा प्रयत्न करत होता. नेहमी प्रमाणे कुणीतरी ओळखीचा असावा म्हणून वर बघितले तर तो जीवे मारण्याच्या धमक्या देत होता. गेटवरील सुरक्षा रक्षक थोडे पुढें सरसावले तसा तो जय श्रीरामच्या घोषणा देत भरधाव गाडीने निघून गेला. ‘, असं म्हणत नागपूर विमानतळावर घडलेला सारा प्रकार सुषमा अंधारे यांनी ट्वीटद्वारे शेअर केला. बघा संपूर्ण ट्वीट सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्या?

Published on: Dec 17, 2024 12:04 PM