अजित पवार यांना शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याकडून खुली ऑफर; म्हणाले, ‘सपोर्ट केला तर…’

| Updated on: Apr 16, 2023 | 7:30 AM

VIDEO | '... तर चांगले दिवस येतील', अजित पवार यांच्याबद्दल शिवसेना नेत्याचं मोठं वक्तव्य; राजकीय चर्चांना उधाण

मुंबई : गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार अचानक नॉट रिचेबल झाले होते. त्यानंतर ते दुसऱ्या दिवशी माध्यमांसमोर आले होते. या दरम्यान त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची डिग्री, ईव्हीएमचा मुद्द्यासह काही मुद्द्यांवर महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या विरोधात भूमिका मांडली होती. त्यामुळे अजित पवार हे भाजपसोबत जाणार असल्याच्या उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्याबद्दल शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी मोठं विधान केलं आहे. या बड्या नेत्याच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विजय शिवतारे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी अजित पवारांच्या भाजप समर्थनावर प्रतिक्रिया दिली. अजित पवारांनी आम्हाला सपोर्ट केल्यानंतर पुरंदरच काय तर महाराष्ट्राचा राजकारण सोप्प होईल, असं मोठं विधान शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी केलं. चांगले लोक एकत्र आल्यावर देशाच्या आणि राज्याच्या हिताच्या दृष्टीने चांगले दिवस नक्कीच येतील, असं त्यांनी म्हटले आहे.

Published on: Apr 16, 2023 07:16 AM
CBI, ED चा वापर घड्याळाची टिकटिक बंद थांबविण्यासाठी होतोय; मविआच्या नेत्याचा गंभीर आरोप
नागपुरात आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा; कोण-कोण उपस्थित राहणार?