विजय शिवतारे स्वत: रायटर? डायरेक्टर की अॅक्टर? त्यांच्यामागे कुणाची पॉवर?

| Updated on: Mar 25, 2024 | 11:16 AM

एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा होता कामा नये, अशा शब्दात शिंदेंच्या शिवतारेंनी दोन्ही पवारांवर जहरी टीका केली आहे. यंदा दोन्ही पवारांचा बिमोड हेच विजय शिवतारे यांचे ध्येय आहे. बघा काय केला हल्लाबोल?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची समजूत काढल्यानंतर ते अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. अजित पवार यांच्यासह शरद पवार यांना पराभूत करायचे या हे हेतू ते निवडणूक लढवणार आहे. मात्र शिवतारेंच्या स्क्रिप्टचे ते स्वतः रायटर आहे की त्यांच्यामागे दुसराच डायरेक्टर बसला आहे. याचीही आता चर्चा होत आहे. एका राक्षसाला थांबवण्यासाठी दुसरा राक्षस मोठा होता कामा नये, अशा शब्दात शिंदेंच्या शिवतारेंनी दोन्ही पवारांवर जहरी टीका केली आहे. यंदा दोन्ही पवारांचा बिमोड हे ध्येय असल्याचे सांगत शिंदेंच्या समजूतीनंतर शिवतारेंनी बारामतीमध्ये लढण्याची घोषणा केली. दरम्यान, विजय शिवतारेंनी घेतलेल्या या नव्या भूमिकेमुळे ते स्वतः त्याचे स्क्रिप्ट रायटर आहेत की ते फक्त स्क्रिप्ट वाचताय…. सध्या अशी चर्चा होतेय.

Published on: Mar 25, 2024 11:16 AM
उज्जैन महाकाल मंदिरात भस्म आरती करताना उधळला गुलाल अन् नको ते घडलं, नेमकं काय झालं?
लोकसभा लढायची नव्हती पण…, पंकजा मुंडेंना तिकीट अन् धनंजय मुंडे बहिणीच्यामागे पाठिशी