मग घाबरता कशाला? अजितदादांनी 2019 मध्ये केलेल्या वक्तव्यावर विजय शिवतारेंचं उत्तर

| Updated on: Mar 18, 2024 | 4:28 PM

अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना २०१९ साली केलेल्या वक्तव्यावर विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर माझा आवाका काहीच नाही तर मग आता घाबरता कशाला? असा सवाल विजय शिवतारे यांनी केला. तर अजित पवार यांनी माझा आवाकाही काढला होता. तुझी लायकी किती? असं अजितदादा बोलले

मुंबई, १८ मार्च २०२४ : बारामतीच्या जागेवरून शिंदे गटाचे माजी मंत्री विजय शिवतारे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आमनेसामने उभे ठाकले आहेत. कोणत्याही परिस्थितीत बारामतीतून लढणारच असा निर्धार शिवतारे यांनी व्यक्त केला आहे. तर माझा आवाका किती हे अजित पवार यांना कळालं असेल, असं म्हणत अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये असताना २०१९ साली केलेल्या वक्तव्यावर विजय शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर माझा आवाका काहीच नाही तर मग आता घाबरता कशाला? असा सवाल विजय शिवतारे यांनी केला. तर ‘अजित पवार यांनी माझा आवाकाही काढला होता. तुझी लायकी किती? तू बोलतो किती? तुझा आवाका किती? असं अजितदादा बोलले होते. माझा नाही अवाका तर कशाला धडपड करतो? महायुतीच्या उमेदवारांना धमक्या का देतोय. इकडे उमेदवार उभे करू, तिकडे उभे करू? असा इशारा देतो. माझा आवाका किती हे अजित पावार बोलले अख्या महाराष्ट्राने ऐकलं आहे.’, असेही शिवतारे म्हणाले.

Published on: Mar 18, 2024 04:28 PM
लोकसभा लढवणार की नाही? विजय शिवतारे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्… मुख्यमंत्र्यांचा ‘भारत जोडो’वरून घणाघात