शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे, मिलिंद नार्वेकर कसबा गणपती चरणी!
दरम्यान आज शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांनी मानाच्या पहिल्या गणपतीला दर्शनासाठी उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
पुण्यात मानाचा पहिला गणपती, कसबा गणपतीच्या दर्शनाला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. दोन्ही नेत्यांनी कसबा गणपतीची आरती केली. गणपती उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातोय. कोरोना काळात लोकांना सगळ्यात जास्त उणीव भासली असेल तर ती आहे सणांची. भारतात सणवाराला जास्त महत्त्व आहे. कोरोना काळात याचीच कमतरता होती. सार्वजनिक उत्सवांवर बंदी होती. पण यावर्षी मात्र गणपती मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालंय. गणपती मंडळ देखील अगदी उत्साहात गणेशोत्सव साजरा करतायत. नेते मंडळी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी दर्शनासाठी उपस्थित राहतायत. दरम्यान आज शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि मिलिंद नार्वेकर यांनी मानाच्या पहिल्या गणपतीला दर्शनासाठी उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.