वरळीत तिहेरी लढत, शिंदेंकडून मोठा ट्विस्ट थेट आदित्य ठाकरेंना घेरणार मिलिंद देवरा

| Updated on: Oct 25, 2024 | 10:19 PM

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शिंदेंनी शिवसेनेचा राज्यसभेचा खासदार मैदानात उतरवलाय. मनसेकडून यापूर्वीच संदीप देशपांडे यांना आदित्य ठाकरेंविरोधात तिकीट दिलंय. त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेने मिलिंद देवरा यांना आदित्य ठाकरेंच्या विरोधात उभं केलंय.

वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरे यांना घेरण्यासाठी महायुतीकडून मिलिंद देवरा यांना विधानसभेच्या मैदानात उतरवलं आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या विरोधात मिलिंद देवरा असतील. मिलिंद देवरा यांनी देखील ट्वीट करून आदित्य ठाकरेंना आव्हान दिलंय. ‘वरळी आणि वरळीवासीयांना न्याय देण्याची वेळ आली आहे. आम्ही प्रयत्नशील आहोत. वरळीच्या विकासासाठी आमचं व्हिजन लवकरच जाहीर करू.’ महायुतीत शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा विधानसभेच्या रिंगणात असतील. त्यामुळे वरळीतील लढत ही तिहेरी झाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून संदीप देशपांडे विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहेत. मिलिंद देवरा हे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत आलेत आणि शिंदेंनी त्यांना राज्यसभेत खासदारही केलं. मात्र वरळी मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरेंना टक्कर देण्यासाठी शिंदेंनी मिलिंद दवेरांना पुढे केलं. यानंतर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना जोरदार टोला लगावला आहे, बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Oct 25, 2024 10:19 PM
‘ते स्वतः जिंकतील का याची शाश्वती नाही, सेटलमेंटसाठी…’, रवी राणांचा नाव न घेता बच्चू कडूंवर निशाणा
मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट, काय झाली चर्चा ?