संजय राऊत यांच्या जळगावातील स्वागतावर काय म्हणाले गुलाबराव पाटील?

| Updated on: Apr 22, 2023 | 7:40 AM

VIDEO | ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचं जळगाव मध्ये जंगी स्वागत, या स्वागतावर शिवसेनेच्या मंत्र्याचा निशाणा, बघा काय म्हणाले?

जळगाव : उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे जळगावमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी त्यांचं जंगी स्वागत करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. जळगावात घुसलो, असे म्हणत संजय राऊत यांनी जळगावात एन्ट्री घेतली. यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य करताना म्हटले, पहिले माझ्या सैन्याशी लढा मग माझ्याशी…पाचोऱ्याचे माजी आमदार स्वर्गीय आर ओ पाटलांच्या पुतळ्याचं उद्घाटन करण्यासाठी उद्धव ठाकरे जळगाव दौऱ्यावर येताय त्यामुळे त्यांनी चौकटीत बोलावं, असं इशाराच गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. तर आमच्या मतावर मातलेला हा बोका जास्त बोलत असेल तर त्यांनी सावधानतेने राहवं, असा इशाराही गुलाबराव पाटील यांनी दिला आहे. तर  पाचोरा येथे उद्धव ठाकरे यांच्या सभेत संजय राऊत यांनी चौकटीत राहून बोलावं अन्यथा सभेत घुसू असा इशारा दिल्यानंतर आता महाविकास आघाडीतील नेत्यांसह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील नेते आक्रमक झाले आहेत. गुलाबराव पाटील यांच्या टीकेला सुषमा अंधारे यांनी उत्तर देताना म्हटले की, कोणाला त्याची क्षमता तपासायची गरज असेल तर नक्कीच यावे, आम्ही त्यांचे स्वागत करू.

Special Report | मराठा आरक्षणावरुन सुप्रीम कोर्टाचा राज्य सरकारला झटका, आता शेवटचं अस्त्र कोणतं?
‘त्यांच्यात दम नाही ते फक्त सुके दम देतात’, गुलाबराव पाटील यांच्यावर कुणी केला हल्लाबोल?