टाईमपास…फुलस्टॉप…केहना क्या चाहते हो… राहुल गांधींच्या सभेवर उदय सामंतांचा हल्लाबोल

| Updated on: Mar 18, 2024 | 2:11 PM

सामनामध्ये छापून आलेला फोटो दाखवत उदय सामंत यांनी जोरदार हल्लाबोल केला. कालची सभा म्हणजे फ्लॉप शो होता...केहना क्या चाहते हो असा प्रश्न यासभेवरून उपस्थित झाला. शेवटचं जे काही भाषण झालं त्याला काहीही अर्थ नव्हता, सामंतांचा ठाकरेंवर हल्लाबोल

मुंबई, १८ मार्च २०२४ : काल शिवाजी पार्क मैदानात इंडिया आघाडीची सभा झाली. तिथली गर्दी पाहता तिथे घ्यायची काही आवश्यकता नाही, शन्मुखानंद हॉलमध्येही होऊ शकली असता एवढीच गर्दी कालच्या सभेला होती. कोणाच्याही चेहऱ्यावर हास्य नव्हते सगळे दुःखी दिसत होते. सामनामध्ये छापून आलेला फोटो दाखवत उदय सामंत यांनी जोरदार हल्लाबोल केला. कालची सभा म्हणजे फ्लॉप शो होता…केहना क्या चाहते हो असा प्रश्न यासभेवरून उपस्थित झाला. शेवटचं जे काही भाषण झालं त्याला काहीही अर्थ नव्हता, असे म्हणत उदय सामंत यांनी ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. महाराष्ट्रातल्या जनतेला विचारलं तर एकाचही भाषण कोणाला समजलं नाही. फक्त तेजस्वी यादव यांचं भाषण जरा चांगल झालं बाकी कोणाचही भाषण चांगलं नव्हतं. ज्या राहुल गांधीच्या सभेला एवढे नेते आले होते व्यासपीठावर बसले होते ते जरी खाली उतरले असते तरी मैदानातील खुर्च्या भरल्या असत्या, असा खोचक टोलाही उदय सामंत यांनी लगावला.

Published on: Mar 18, 2024 02:11 PM
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 च्या हाती
एवढी मोठी हस्ती, माझ्या जीवाला धोका; बच्चू कडूंनी उडवली रवी राणांच्या वक्तव्याची खिल्ली