आम्ही पुन्हा सत्तेत येणार, आगामी निवडणुकीच्या विजयाचं गणितंच शिवसेनेच्या नेत्यानं माडलं

| Updated on: Feb 25, 2023 | 10:10 PM

VIDEO | स्वतःच्या अस्तित्वासाठी धडपणारे दोन पक्ष एकत्र आले तर त्यांना माझ्या शुभेच्छा, शिवसेना नेत्यानं लगावला खोचक टोला

पुणे : उद्धव ठाकरे आणि आपचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवा यांची भेट झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात चर्चेंना उधाण आलं आहे. अशातच त्यांच्या भेटीगाठी झाल्या असल्या तरी महाराष्ट्रात अरविंद केजरीवाल यांच्या मताला किंमत शून्य असल्याची जोरदार टीका मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. तर या भेटीबद्दल बोलताना मंत्री उदय सामंत यांनी मात्र या भेटीचा कोणताही फरक राज्याच्या राजकारणावर होणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे आप या पक्षाला महाराष्ट्रात शून्य किंमत आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी लोकसभेच्या निवडणुका होतील तेव्हा 45 खासदार निवडून येतील तर विधानसभेच्या निवडणुकीत 200 पेक्षा जास्त जागांवर विजय आमचा होईल आणि सत्तेत आम्ही येऊ, असा विश्वासही उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.

Published on: Feb 25, 2023 10:10 PM
राज ठाकरे यांना मारण्याची सुपारी दिली होती, मनसे नेत्यानं काय केला गौप्यस्फोट?
Special Report | Narayan Rane यांचा Ajit Pawar आणि Uddhav Thackeray यांना थेट इशारा