भरत गोगावले यांनी टोचले संतोष बांगर यांचे कान, बघा नेमकं काय म्हणाले….
संतोष बांगर यांनी आक्षेपार्ह हातवारे केल्याच्या सवालावर गोगावले म्हणाले, सर्वच एकनाथ शिंदे, भरत शेठ होऊ शकत नाही. काही असे तसे थोडे असतात जर असे काही झाले असेल तर त्याला आम्ही चूक सुधारायला लावू. काही उत्साहाच्या भरात काही बोलून जातात जर एखदी चूक झाली तर
मुंबई, ११ मार्च २०२४ : ‘बरीचशी लोकं दोन राऊत भावंडांना घाबरून बाहेर पडत नव्हती. मात्र हिंमत करून या ठिकाणी शाखा काढली. याच मतदारसंघात मला निरीक्षण म्हणून नेमलं आहे. त्यामुळे विक्रोळीत शिवसैनिकांचा निर्धार घेतला आहे. ही फक्त झलक आहे. बाकी सगळं आचार संहिता लागल्यानंतर पाहायला मिळेल’, असे म्हणत शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी सूचक वक्तव्य केले आहे. तर यावेळी त्यांनी संतोष बांगर यांनी आक्षेपार्ह हातवारे केल्याच्या सवालावरही भाष्य केले. गोगावले म्हणाले, सर्वच एकनाथ शिंदे, भरत शेठ होऊ शकत नाही. काही असे तसे थोडे असतात जर असे काही झाले असेल तर त्याला आम्ही चूक सुधारायला लावू. काही उत्साहाच्या भरात काही बोलून जातात जर एखदी चूक झाली तर त्यांनी चार पावले मागे येवून चूक सुधारायला पाहिजे. विक्रोळी शिवसेना विधानसभा प्रमुख अनिल पांगारे यांनी विक्रोळीत शिवसैनिकांचा निर्धार मेळावा भरवला होता. यामध्ये भरत गोगावले यांनी उपसस्थिती लावली होती. विक्रोळी विधानसभा प्रमुख अनिल पांगारे यांनी विक्रोळी टागोर नगरमध्ये शिवसैनिकांचा निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले, उपनेते माजी नगरसेविका सुवर्णा करंजे, शिवसेना सचिव संजय मशिलकर तसेच शिवसेनेचे अनेक नेते या कार्यक्रमात उपस्थित होते आणि मोठ्या उत्साहात हा मेळावा पार पडला.