आमदार अपात्रतेचा निकाल येणार… पण निवडणुकीवर त्याचा परिणाम होणार? बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Jan 10, 2024 | 12:18 PM

शिंदे मुख्यमंत्री असतानाच त्यांच्याच नेतृत्वात लोकसभेच्या निवडणुका लढल्या जातील. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल लागल्यास ठाकरेंकडे आदित्य, ऋतुजा लटके दोनच आमदार राहतील. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आपात्रतेचाच मुद्दा उद्धव ठाकरे गाजवू शकतात.

मुंबई, १० जानेवारी २०२४ : आमदार अपात्रतेचा निकाल कोणाच्याही बाजूने येवो पण त्याचे थेट परिणाम आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीवर होणार तर आपात्रतेचा निकाल कसा परिणामकारक असू शकतो, जाणून घेऊया…लोकसभा निवडणुकीला अवघे साडेतीन महिन्याचा कालावधी आहे. पण त्यापूर्वी आमदार अपात्रेचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या निकालाचा थेट परिणाम निवडणुकांवर होईल. एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल आल्यास मुख्यमंत्रीपदी शिंदे कायम राहतील, पूर्ण क्षमतेने काम करतील. शिंदे मुख्यमंत्री असतानाच त्यांच्याच नेतृत्वात लोकसभेच्या निवडणुका लढल्या जातील. दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्याविरोधात निकाल लागल्यास ठाकरेंकडे आदित्य, ऋतुजा लटके दोनच आमदार राहतील. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात आपात्रतेचाच मुद्दा उद्धव ठाकरे गाजवू शकतात. तसंही निवडणुकी जवळ आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाल्याचे काल पाहायला मिळाले.

Published on: Jan 10, 2024 12:18 PM
रामाच्या विधानावरुन जितेंद्र आव्हाड अन् अमोल मिटकरी यांच्यात ‘महाभारत’
अपात्रतेवर आज महानिकाल, शिंदेंचे १६ तर ठाकरेंच्या १४ आमदारांच्या भवितव्याचा होणार फैसला