‘का लोकांना छळताय? आता तुम्ही आम्हाला विसरा’, गुलाबराव पाटील यांनी कुणाला दिला सल्ला
VIDEO | आदित्य ठाकरे यांनी केलेल्या 'त्या' आरोपांना शिवसेनेच्या या नेत्याचं प्रत्युत्तर, काय म्हणाले बघा
जळगाव : ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडाबाबतच्या केलेल्या गौप्यस्फोटावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, आमच्या बंडाला आणि उठावाला आता नऊ महिने होऊन गेले. किती एकच विषय लावून धरणार लोकांना छळण्यापेक्षा आता पक्षबांधणी करून नव्याने सरकार कसं येईल याचा विचार करा, असा सल्लाही गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला. तेच तेच बोलण्याशिवाय त्यांच्याकडे काहीह नाही. आता राज्याचे काही बघणार की नाही? एखाद्या घरात तरूणाचा मृत्यू झाला तरी काही दिवसात लोक ते विसण्याचा प्रयत्न करतात. तुम्हीही आम्हाला आता विसरा. तेच तेच ऐकून पाहून लोकही कंटाळल्याचे त्यांनी म्हटले आहे.
Published on: Apr 13, 2023 02:44 PM