“शरद पवार यांचा राजीनामा आणि नंतर तो मागे घेण्याचा निर्णय म्हणजे इमोशनल बॉम्ब”
VIDEO | शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यपदावरून निवृत्ती आणि राजीनामा मागे घेण्याचा निर्णय यावर शिवसेनेच्या नेत्याची प्रतिक्रिया, म्हणाले...
बुलढाणा : शरद पवार (Sharad Pawar) यांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीच्या पक्षातच अस्वस्थता निर्माण झाली होती. मात्र समितीच्या निर्णयानंतर शरद पवार यांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. शरद पवार यांच्या राजीनामा मागे घेण्याच्या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. अशातच शिवसेनेच्या आमदारानं शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यपदावरून निवृत्ती आणि नंतर तो राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्याचं कारणंच सांगितलं आहे. संजय गायकवाड म्हणाले, ‘शरद पवार हे देशाचे जानते नेते आहेत आणि पक्षांतर्गत जे काही सुरू आहे. त्यावरून असे लक्षात येते की राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना भावनिक करून एकत्र राहण्यासाठी शरद पवार यांनी फेकलेला हा इमोशनल बॉम्ब आहे.’ यासह ते असेही म्हणाले, शरद पवार जे बोलतात ते कधीच करत नाहीत, याचा सर्वांनाच अनुभव आहे. अजित पवारांबद्दल गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार याबाबत चर्चा सुरू होत्या, त्यामुळे शरद पवार यांनी ही खेळलेली राजकीय खेळी आहे का? असा सवाल संजय गायकवाड यांना विचारला असता ते म्हणाले, ‘ शरद पवार यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे जर एखादा निर्णय घेतला तर कार्यकर्ते पेटून उठतात आणि पक्ष वाढीच्या वेळी त्याची मदत होते. त्यामुळे हा प्रयोग झाला असू शकतो. ‘