शिवसेनेच्या नेत्याचं मोठ अन् सूचक विधान, ‘अजित पवार सोबत आले तरी मुख्यमंत्री…’
VIDEO | अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांवर शिवसेनेच्या आमदाराचं भाष्य; म्हणाले, '...हा मोठा राजकीय भूकंप'
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात एकच चर्चा होतेय ती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे भाजपमध्ये पक्ष प्रवेश करणार… या चर्चा जरी असल्या तरी देखील भाजपकडून स्वागत असल्याचे म्हटले जात आहे तर काही आमदारांना अजित पवार यांना जाहीर पाठिंबा देखील दर्शवला आहे. अशातच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या सर्व राजकीय भूकंपाच्या संभाव्य चर्चांवर भाष्य केले आहे. ते म्हणाले, ‘जर अजित पवार खरंच भाजपमध्ये गेलेत तर हा राज्यातील राजकारणात मोठा भूंकप असणार आहे. ५० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी जो भूंकप केला होता त्यानंतर हा दुसरा भूकंप असून शकतो. कार्यक्रम रद्द केले जात आहे, हेच मोठे संकेत आहे.’ असे ते म्हटले तर पुढे त्यांनी असेही म्हटलं की, अजित पवार यांना कोणतं पद द्यायचं हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. आणि जरी अजित पवार सोबत आले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच राहतील, असेही ठामपणे म्हटले आहे.