‘याच बांडगुळांनी शक्ती दाखवली…’, शिवसेनेच्या आमदारानं उद्धव ठाकरे यांच्या टीकेला थेट दिलं प्रत्युत्तर

| Updated on: Feb 28, 2023 | 9:00 PM

VIDEO | बाळासाहेबांनाच फक्त ठाकरे हे नाव शोभतं, शिवसेनेच्या आमदारानं उद्धव ठाकरे यांच्यावर केला हल्लाबोल, बघा काय दिलं टीकेला थेट प्रत्युत्तर

मुंबई : उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या जाहीर सभेत त्यांनी शिंदे गटावर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरे शिंदे गटातील सर्व आमदारांना बांडगुळ असल्याची उपमा देत स्वतःला वटवृक्ष समजतात, कधी या वडाच्या पारंब्या तुटून पडतील हे सांगता येत नाही, असे म्हणाले होते. यावर शिवसेना शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही बांडगुळं नाही तर बाळासाहेब यांनी उभारलेल्या वटवृक्षाच्या पारंब्या आहोत. हा वटवृक्ष बाळासाहेबांच्या विचारांनी मजबूत असा उभा आहे. उद्धव ठाकरे यांना याच बांडगुळांनी शक्ती दाखवून दिली आहे. त्यामुळे ते आज कुठं आणि आम्ही आज कुठं आहोत, हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे, असे म्हणत त्यांनी खोचक टोला लगावला आहे.

Published on: Feb 28, 2023 09:00 PM
‘अंकल…अंकल, काकींना नाव सांगेल हं…’, भर सभागृहात अजित पवार यांनी कुणाला डिवचलं, बघा व्हिडीओ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिला शब्द, म्हणाले…