अजित पवार मनाने ‘वज्रमूठ’मध्ये नसतील, तर नेमके कुठे असणार? हे लवकरच कळेल, शिवसेनेच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

| Updated on: May 01, 2023 | 3:09 PM

VIDEO | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लवकरच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार, कुणी केला दावा?

छत्रपती संभाजीनगर : मुंबईतील बीकेसी मैदानात महाविकास आघाडीची आज वज्रमूठ सभा होणार आहे. मविआच्या या जाहीर सभेपूर्वीच विरोधकांकडून मविआवर जोरदार निशाणा साधला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार लवकरच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होणार असल्याचा मोठा दावा शिवसेनेच्या आमदाराकडून केल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांना आज सगळ्यात जास्त त्रास होत असेल. त्यांना सभेत खुर्ची आहे की नाही ते पण माहीत नाही. अजित पवार सभेत आले तर काय बोलणार माहित नाही. पण ते मनापासून या सभेत नाहीत. शरीराने ते सभेत असतील आणि ते मनातून कुठे आहेत, हे तीन ते चार दिवसात समजले. त्यामुळे लवकरच सगळ्यांना दिसेल. अजितदादा सगळे विषय हसून खेळून टोलवत आहेत. याचाच अर्थ त्यांच्या मनात काहीतरी आहे ते 100 टक्के निर्णय घेतील, असेही शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. तर तीन पक्ष एकत्रित आज गर्दी करताय आणि आम्ही सोबत आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करताय. पण या तिन्ही पक्षांच्या सभेमुळे महाराष्ट्र कुणाच्या मागे ते कळत नाही. सभेमुळे वातावरण बदलतंय, हा समज चुकीचा आहे, असं शिरसाट म्हणाले.

Published on: May 01, 2023 03:05 PM
आमदार शिवेंद्रराजेंचं साताऱ्यात पारडं जड…; खासदारांना भोपळाही फोडता नाही आला
‘भाजपची नजर चिनी’, संजय राऊत यांचा आशिष शेलार यांना नेमका काय टोला?