पक्षाची मालकी समजणाऱ्यांसाठी हा निकाल म्हणजे…. शिवसेना नेत्याचं नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र
कायद्याच्या चौकटीत बसणारा शिवसेनेचा बंड असल्याने कोर्टानंही त्याला मान्यता दिली आहे. राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. यावरही शिरसाट यांनी भाष्य केले आहे.
मुंबई, १० जानेवारी २०२४ : आजच्या निकालाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अनेक लोकं शिवसेनेला आपली मालकी समजतात, त्यांना हा निकाल मार्ग दाखवणारा आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटाला याची उत्सुकता असली तरी निकाल आमच्या बाजूनेच लागणार असा विश्वासही शिवसेनेचे आमदार नेते संजय शिरसाट यांनी व्यक्त केला. कायद्याच्या चौकटीत बसणारा शिवसेनेचा बंड असल्याने कोर्टानंही त्याला मान्यता दिली आहे. राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या भेटीवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली. यावरही शिरसाट यांनी भाष्य केले आहे. ‘नार्वेकर व्यक्ती नाही तर न्यायमूर्तीच्या भूमिकेत आहे. ते का एकनाथ शिंदे यांच्या विनवण्या करतील. कोणाच्याही विरोधात निकाल लागला तरी एका गटाला सुप्रीम कोर्टात जावंच लागणार आहे. लोकं तुम्हाला कशी सहानुभूती देतील. अंदाज वर्तवण्यातूनच पक्षाचा सत्यानाश झालाय. तरी त्यातून ते बाहेर येत नाही. जनेला सर्वकाही माहित आहे. जनता पाठिशी आहे.’, असं संजय शिरसाट यांनी व्यक्त केला आहे.