संजय राऊत यांच्याबद्दल बोलतांना संजय शिरसाट यांच्यी जीभ घरसली अन् म्हणाले…
VIDEO | संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडल्यानंतर शिवसेनेचे आमदार भडकले, संजय राऊत यांच्यावर भाष्य करतांना जीभ घसरली
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी राहुल कुल, कृषीमंत्री दादा भूसे यांच्यावर आरोप करत राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली नसल्याचे त्यांनी म्हटले तर चुंबन प्रकरणावर एसआयटी स्थापन होतेय पण बार्शीतल्या प्रकरणांमध्ये कुठली कारवाई होत नाही अशी खंत व्यक्त करत संजय राऊत यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. या टीकेनंतर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, संजय राऊत हा टिकास्त्र सोडत नाहीये तो मुळात नाच्या आहे. तो इतरांच्या तालावर नाचतोय. अक्कलेचा आणि त्याचा संबंध नसलेला माणूस आहे, प्रत्येक आमदारावर टीका करणं, कुणाचं चारित्र्य हणन करणे, कुणाच्या सांगण्यावरून, कुणाच्या इशाऱ्यावरूव असे वक्तव्य तो रोज करतोय, पहिल्यांदा असे वक्तव्य करत नसल्याचेही संजय शिरसाट यांनी खोचकपणे म्हटले आहे.