भगतसिंह कोश्यारी गुन्हेगार हे ठरवणारे संजय राऊत कोण?, शिवसेनेच्या नेत्याचा हल्लाबोल
VIDEO | उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांना बाजूला बसवू नये, त्याची लायकी नाही, कुणी केली सडकून टीका
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे महाराष्ट्राचे गुन्हेगारी असल्याची टीका केली. कायदेशीर मार्गाने कोश्यारी यांना गुन्ह्याची फळं मिळणार असल्याचं संजय राऊत म्हणाले. यावर शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. भगतसिंह कोश्यारी यांना गुन्हेगार ठरवणारे संजय राऊत कोण, असा सवाल शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय. संजय राऊत हे ठाकरे गटाचे गुन्हेगार असल्याचा पलटवारही शिरसाट यांनी केला. तर संजय राऊत यांना तो अधिकार नाही. संजय राऊत यांची कुवतदेखील नाही. खरा गुन्हेगार संजय राऊत यांच्या पक्षातला आहे. म्हणून उद्धव साहेबांनी त्याला बाजूला घेऊन बसूदेखील नये. संजय राऊत यांची लायकीदेखील नाही. कोण कोणाला भेटायला गेलं. सर्वसामान्यांचा प्रश्नांचा काही संबंध नाही. तुम्ही फारुख अब्दुल्ला भेटू शकता. तुम्ही त्यांच्या मुलांना भेटू शकता. तुम्हाला कोणी विचारलं की हिंदुत्व तुम्ही जोपासू शकता तर तेव्हा कशी मिरची लागेल. तुम्हाला त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष केलेलं कधीही बरं, असा टोला संजय राऊत यांना संजय शिरसाट यांनी लगावला.