‘शरद पवार यांनी भाकरी न फिरवताच अजित पवार यांची जिरवली’, कुणी केला हल्लाबोल
VIDEO | अजित पवार यांना आता दरवाजे बंद, शरद पवार यांचा राजीनामा मागे घेण्याच्या पार्श्वभूमीवर कुणी केला दावा
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव तो मागेही घेतला. अशातच शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना संजय शिरसाट यांनी सत्तासंघर्षावर निकाल आमच्या बाजूने लागेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, आधी निकाल येऊ दया मगच सर्वांनी आपलं ज्ञान पाजळावं. आज सर्व जण सुप्रीम कोर्टाचे जज असल्यासारखे प्रतिक्रिया देत आहेत. निकाल हा आमच्या बाजूनेच लागेल. कारण आम्ही काही चुकीचं केलेलं नाहीये. आता धास्ती कोणाला आहे तर ठाकरे गटाच्या आमदारांना आहे. कारण आम्ही पात्र झालो तर ते अपात्र होतील, असं संजय शिरसाट म्हणाले. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘शरद पवार यांनी भाकरी न फिरवताच अजित पवार यांची जिरवली’, असे म्हणत संजय शिरसाट यांनी अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. इतकंच नाही तर संजय शिरसाट यांनी सुषमा अंधारे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. संजय शिरसाट म्हणाले, एका कार्यक्रमात सुषमा अंधारे या शरद पवार यांच्यासमोर रडल्या. त्यावर प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. सुषमा अंधारे या मोठ्या कलाकार आहेत. त्यांच्यावर मी बोलणार नाही. बोलू इच्छित नाही, असं ते म्हणाले.