इम्तियाज जलील यांना लक्ष्य करत संजय शिरसाट म्हणाले, ‘ही दंगल…’

| Updated on: Mar 30, 2023 | 4:02 PM

VIDEO | छत्रपती संभाजीनगरमध्ये होणाऱ्या राड्यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांचं भाष्य, बघा काय म्हणाले?

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री दोन गटात हाणामारी झाली. शाब्दीक चकमकीनंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. यावेळी समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनांवरही दगडफेक करत वाहनेही जाळली. त्यामुळे संभाजीनगरमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेवर संभाजीनगरचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय शिरसाट यांनी MIM चे खासदार इम्तियाज जलील यांना लक्ष्य करत त्यांनी केलेल्या भाषणाचा परिणाम युवा वर्गावर झाला. त्यामुळे दंगल भडकली. दंगलीत अर्धा तासात पेट्रोल बॉम्ब कुठून आले? असा सवाल संजय शिरसाट यांनी केला. संभाजीनगरमधील दंगल ही घडवून आणलेली आहे. हे लोक मूर्ख आहेत त्यांना काय बोलायचं हे कळत नाही. शहराची शांतता कोणी बिघडवत असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली आहे. विरोधकांकडून या विषयावर राजकारण केले जात असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला आहे.

Published on: Mar 30, 2023 04:02 PM
सव्वा किलो चांदीतून साकारली अयोध्या राम मंदिराची प्रतिकृती, बघा झलक
छत्रपती संभाजीनगरच्या राडा प्रकरणी मोठी अपडेट, ३०० ते ४०० जणांवर गुन्हा