हे देशद्रोहापेक्षाही खतरनाक….काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवर संजय शिरसाटांचं मोठं वक्तव्य

| Updated on: Mar 17, 2024 | 5:57 PM

काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नेते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही आज बसताय हे देशद्रोहापेक्षाही खतरनाक आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

मुंबई | 17 मार्च 2024 : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा सध्या सुरु आहे. मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आज या यात्रेची सांगता सभा होणार आहे. या सभेपूर्वी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नेते संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ‘ज्यांनी शिवसेना वाढवण्यासाठी ज्या शिवसैनिकांनी प्रयत्न केले त्यांच्यासाठी ही सभा आजचा दिवस काळा दिवस आहे. त्या शिवाजी पार्कवर बाळासाहेब पाहण्याची सवय शिवसैनिकांना आहे. तिथे राहुल गांधी भाषण करणार आणि ठाकरे गटातील नेते तेथे बसणार आहे. काँग्रेसवर अत्यंत कडक शब्दात बाळासाहेब ठाकरे यांनी टीका केली होती. मात्र आज त्यांचेच गोडवे काही लोकं गाणार आहेत. ही शिवसेना आपल्याला अपेक्षित आहे का?’ असा सवाल शिरसाट यांनी केला आहे. तर उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना घेऊन सावरकरांना वंदन केलं पाहिजे, याच काँग्रेसने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कडवट टीका केली होती. त्यांच्याच मांडीला मांडी लावून तुम्ही आज बसताय हे देशद्रोहापेक्षाही खतरनाक आहे, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 17, 2024 05:57 PM
ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण हाती घेतल्यानंतर आमश्या पाडवी म्हणाले…
उद्धव ठाकरे यांनी ‘मोदी का परिवार’वरून मोदींना डिवचलं, तुमचा परिवार कुठे?