संभाजीनगरच्या जागेवर लोकसभा कोण लढणार? शिंदे गट की भाजप? संजय शिरसाट स्पष्टच म्हणाले…

| Updated on: Mar 31, 2024 | 3:38 PM

शिवसेनेची जागा भाजपकडे घेण्याचा डाव भाजप आखत असल्याचे एका सर्वेतून समोर आले. यावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार नेते संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया... हा भाजपचा डाव नाही... तर कोणाचा काय सर्व्हे आला याला जास्त महत्व आम्ही देत नाही तर...

शिवसेनेची जागा भाजपकडे घेण्याचा डाव भाजप आखत असल्याचे एका सर्वेतून समोर आले. यावर शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार नेते संजय गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिले आहेत. ‘हा भाजपचा डाव नाही… तर कोणाचा काय सर्व्हे आला याला जास्त महत्व आम्ही देत नाही तर त्या सर्व्हेकडे फक्त गाईडलाईन म्हणून पाहिलं जातं. सर्व्हे हा परिपूर्ण नसतो. जर मग पक्षच चालवायचाय तर मग सर्व्हेच्या आधारावर चालवू.. पक्ष हा सर्व्हेच्या आधारावर चालत नसतो तर स्थानिक पक्षाच्या कार्यकर्त्याच्या मतावर आधारित असतं. भाजप काही मागतोय म्हणून आम्ही काही देतोय असं काही नाही. दोन्ही पक्ष सामंजस्याने ही भूमिका बजावताय. कोणत्याही पक्षाला वाटते की, आपले उमेदवार जास्त असावे म्हणून भाजपलाही तसे वाटते. असा आग्रह जरी असला तरी अंतिम निर्णय नेते लोक घेतील.’, असे संजय शिरसाट म्हणाले. तर पुढे त्यांनी असेही म्हणाले, भाजप कुरघोडी करेल किंवा हक्काच्या शिवसेनेच्या जागा मागेल अशातला भाग नाही.

Published on: Mar 31, 2024 03:38 PM
निवडणूक रोख्यातून भाजपाचे बिंग फुटल्याने केजरीवाल यांना अटक, उद्धव ठाकरे यांचा आरोप
खरे संविधानाचे रक्षक आम्हीच, भाजपाचे नेते आशिष शेलार यांचा दावा