ठाकरे-फडणवीस भेटीवर संजय शिरसाट म्हणाले, उद्धव ठाकरे आमच्यासोबत आले तर…
भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज विधानभवनात भेट, या भेटीनंतर आता संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया...
मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक अनपेक्षित घटना घडल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान, अशातच आज एक वेगळी आणि आश्चर्यकारक घटना घडली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज अनेक महिन्यांनी भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस भविष्यात एकत्र येणार का? अशा चर्चा रंगताना दिसत आहे. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज अचानक विधिमंडळात झालेली ती भेट आहे. उद्धव ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आम्ही सगळे सोबत आलो तर वेगळी ताकद निर्माण होईल, आणि तसं झालं तर जे मेलेले पक्ष होते ते जिवंत झाले नसते त्यांचा आवाज वाढला नसता, असे संजय शिरसाट म्हणाले. ही युती जुळली तर आम्हाला काय अडचण होईल, याकडे विरोधी पक्षाने पाहूच नये. त्यांना पहाटेची शपथ घेण्याची संधी मिळणार नाही, यांचं त्यांनी भान ठेवावं, असा खोचक टोलाही संजय शिरसाट यांनी लगावला आहे.