अयोध्या दौऱ्यानंतर शिवसेनेनं घेरलं, संजय राऊत हे कलीयुगातील शकुनीमामा, कुणाचं टीकास्त्र

| Updated on: Apr 10, 2023 | 8:13 PM

VIDEO | 'संजय राऊत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हिंदुत्वापासून दूर करायचे काम करत आहेत', हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना नेत्यानं पुन्हा डिवचलं

छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच त्यांच्या आमदार आणि खासदारांसह अयोध्या दौऱ्यावरून परतले आहे. मात्र या दौऱ्यावरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेतील नेत्यावर जोरदार टीका केली होती. संजय राऊत, आदित्य ठाकरे, चंद्रकांत खैरे यांनी या दौऱ्यावरून शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना सत्ताधारी गटातील आमदारानीही जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. अयोध्येतील दौऱ्यावर करण्यात आलेल्या टीकेवर बोलताना शिवसेनेचे आमदार संजय राऊत म्हणाले, ज्या पद्धतीने आमचे उत्स्फूर्त स्वागत झाले तसे स्वागत आतापर्यंत अयोध्येमध्ये कुणाचेच झाले नाही. त्यामुळे संजय राऊत यांची पोटदुखी वाढली आली. लोकांच्या ज्या धार्मिक भावना आहेत. त्यावर टीका करण्याचे काम संजय राऊतसारखा पापी माणूस करतो आहे, अशी टीकाही संजय शिरसाट यांनी केली आहे. संजय राऊत हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांना हिंदुत्वापासून दूर करायचे काम करत असून संजय राऊत म्हणजे कलियुगातील शकुनीमामा आहे, असे म्हणत त्यांनी सडकून टीका केली आहे

Published on: Apr 10, 2023 08:13 PM
“पांडुरंगाच्या मंदिरात चांगल्या लोकांची नावं घ्या”, दीपक केसरकरांनी नाव न घेता कुणाला लगावला टोला
निवडणूक आयोगाचा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, पक्षाच्या राष्ट्रीय दर्ज्याबाबत मोठा निर्णय