तर तुम्ही दोन दिवस जेवू नका, आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्या विद्यार्थ्यांना अजब सल्ला

| Updated on: Feb 09, 2024 | 11:47 PM

शिंदे गटाचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्यांना अजब सल्ला दिल्याने संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेंत आले आहेत. तर तुम्ही दोन दिवस जेवू नका....चिमुकल्यांना हा अजब सल्ला दिल्याने संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेंत आले आहेत.

हिंगोली, ९ फेब्रुवारी, २०२४ : शिंदे गटाच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांचे पुन्हा एकदा एक वक्तव्य चांगलेच व्हायरल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ‘आई-वडील मला मतदान करत नसतील तर तुम्ही दोन दिवस जेवू नका’, असे विधान शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे. शिंदे गटाचे कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचा चिमुकल्यांना हा अजब सल्ला दिल्याने संतोष बांगर पुन्हा एकदा चर्चेंत आले आहेत. पुढे संतोष बांगर असेही म्हणाले की, त्यांनी विचारलं का जेवत नाही तर त्यांना म्हणायचं आमदार संतोष बांगर यांना मतदान करा तेव्हा जेवतो नाहीतर जेवत नाही… कळमनुरी विधानसभेतील लाख येथील विद्यार्थ्यांना आमदार संतोष बांगर यांनी हा अजब सल्ला देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Published on: Feb 09, 2024 11:47 PM
छगन भुजबळ यांचं अडनाव वाटोळं करणारा असं हवं होतं, मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा डिवचलं
Video | मनोज जरांगे यांचं तिसऱ्यांदा उपोषण सुरु, काय आहेत मागण्या पाहा