शहाजीबापू पाटलांचा संजय राऊत यांच्यावर घणाघात, ‘खऱ्या बापाचा असल्यासारखं…’
शहाजी बापू पाटीलने त्याला खासदार व्हायला मतं दिले पण तो इतकी वर्षे खासदार आहे. पण एकदा तरी खासदार निधीचे काम केल्याचे कधी सांगतो का? असा सवाल करत शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत चांगलंच फटकारलं आहे.
राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांकडून हल्लाबोल केला जात आहे. सोलापूर येथे बोलत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणल्यावर विरोधक कशा रीतीने रोज वेगवेगळ्या शब्दात टीका करीत होते याचा समाचार घेताना लागा खऱ्या बापाचे असल्यासारखे एका शब्दावर ठाम राहा असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावरच नाव न घेता खोचक टोला लगावला आहे. पुढे ते असेही म्हणाले, ‘संजय राऊत सकाळी ९ वाजेचा ठोका काय चुकवू देत नाही. रोज सकाळी दांडकी घेऊन बसतो आणि बडबडायला सुरूवात करतो. संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला भांबावून सोडण्याचं काम संजय राऊत करतोय. आम्ही काय करतोय हे कशाला सांगतोय तो… या शहाजीबापू पाटील याने तो खासदार व्हावं म्हणून मतं दिलंय.’, असं एकेरी उल्लेख करत शहाजीबापू पाटील यांनी संजय राऊत यांच्यावर शेलक्या शब्दात टोलेबाजी केली आहे.