घराणेशाहीवरुन शिवसेना आणि मनसेत जुंपली, संदीप देशपांडेंच्या टीकेला मनिषा कायंदेंचं प्रत्युत्तर
बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळेच शिवसेनेची आज ही अवस्था झाली, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी स्वत:च्या मुलालाच राजकारणात पुढे का आणलं, संदीप देशपांडे यांना पुढं का आणलं नाही? असा सवाल केलाय. त्यामुळे घराणेशाहीवरुन आता शिवसेना आणि मनसेतच जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जोरदार टोला हाणलाय. अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा, वही बनेगा जो हकदार होगा, असं म्हणत संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत एक फोटोही पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये राज ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे असून दोघंही हात जोडून अभिवादन करताना दिसत आहेत. त्यावर शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनीही देशपांडेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. बाळासाहेबांच्या पुत्रप्रेमामुळेच शिवसेनेची आज ही अवस्था झाली, असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यावर राज ठाकरे यांनी स्वत:च्या मुलालाच राजकारणात पुढे का आणलं, संदीप देशपांडे यांना पुढं का आणलं नाही? असा सवाल केलाय. त्यामुळे घराणेशाहीवरुन आता शिवसेना आणि मनसेतच जुंपली असल्याचं पाहायला मिळत आहे.
Published on: Jul 25, 2022 10:29 PM