पवारशाही, उद्धवशाही समूळ नष्ट करा अन्…, गजानन किर्तीकर यांची घणाघाती टीका

| Updated on: Mar 19, 2023 | 11:22 PM

VIDEO | उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा विचार केला तेव्हाच हिंदुत्व राष्ट्रीयत्त्व पुसलं, गजानन किर्तीकर गरजले

रत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आज रत्नागिरीतील खेडमध्ये झाली. दोन आठवड्यांपूर्वी ५ मार्च रोजी उद्धव ठाकरे यांनी खेडच्या गोळीबार मैदानावर सभा घेतली होती. त्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे आजच्या सभेतून शिंदे नेमकं काय बोलणार याकडे साऱ्याचे लक्ष लागले होते. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भाषणापूर्वी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन किर्तीकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली. ‘उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा विचार केला तेव्हाच हिंदुत्व राष्ट्रीयत्त्व पुसलं. उद्धव ठाकरे यांनी ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपली होती.’ असे म्हणत खंत व्यक्त केली. खेडमध्ये सभा होत असतानाच गजानन कीर्तिकर यांनी टीका करताना त्यांनी ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी गजानन कीर्तिकर यांनी रामदास कदम यांचा गौरव करत पवारशाही, उद्धवशाही समूळ नष्ट करून शिंदेशाहीला साथ द्या, असे आवाहनही केले.

Published on: Mar 19, 2023 11:21 PM
सलमान खानच्या जीवाला पुन्हा एकदा धोका, कुणी दिली जीवे मारण्याची धमकी
खेडमधून आरोपांचा ‘गोळीबार’, एकीकडे ठाकरे-शिंदे तर दुसरीकडे जाधव-कदम; बघा खंडाजंगी