Sanjay Raut | हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा; राऊतांचं भाजपला पिंजऱ्यात येण्याचं आवतन

| Updated on: Jun 11, 2021 | 2:32 PM

शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे.

शिवसेना नेते संजय राऊत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील शाब्दिक चकमकी अजूनही सुरूच आहेत. आजही संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका केली. शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच संजय राऊत यांनी भाजपला दिलं आहे. संजय राऊत आज नंदूरबारमध्ये होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची खिल्ली उडवली.

चंद्रकांत पाटलांचा काल वाढदिवस होता. त्यांनी जास्त केक खाल्ला असेल. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेऊ नका, असं सांगतानाच शिवसेना हा पिंजऱ्यातला वाघ आहे, असं चंद्रकांतदादा म्हणत आहे. त्यांना तसं वाटत असेल तर मी त्यांना पिंजऱ्यात येण्याचं आमंत्रण देतो, असं सांगतानाच हिंमत असेल तर वाघाच्या मिशीला हात लावून दाखवा, असं आव्हानच त्यांनी दिलं.

Published on: Jun 11, 2021 02:32 PM
Headline | 1 PM | वीजबिल माफ होऊ शकत नाही – उर्जामंत्री नितीन राऊत
संभाजीराजे माझे भाऊ, मी त्यांना भेटणार, 3 ते 4 दिवसात भेट होईल : उदयनराजे भोसले