Mumbai | मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानानंतर शिवसेना खासदार संजय राऊत वर्षावर दाखल

| Updated on: Sep 18, 2021 | 3:24 PM

मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाले आहेत.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी औरंगाबादेत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपबाबत भावी सहकारी असं वक्तव्य केलं. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीतच मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर दाखल झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल औरंगाबादमधील कार्यक्रमात भाषणाची सुरुवातच भाजपला ऑफर देत केली होती. मुख्यमंत्री म्हणाले, “मंचावर उपस्थित आज-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी”. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना उद्देशून मुख्यमंत्र्यांनी एकत्रित आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केला होता. मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ गुगलींने सगळेच अवाक् झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर महाविकास आघाडीत पडसाद उमटत असल्याचं चित्र आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीमध्ये नापसंती असल्याची चर्चा आहे. संजय राऊत हे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा काही निरोप घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले आहेत का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.

Kishori Pednekar | मुंबईत अशुद्ध पाणी पुरवठ्यावर महापौर किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या ?
Radhakrishna Vikhe Patil | राजकारणात कोणीच मित्र आणि शत्रू नसतात, त्यामुळे काहीही चमत्कार होऊ शकतो