पूरग्रस्तांच्या वेदना-आक्रोश आमच्या इतकं कुणी समजू शकणार नाही : संजय राऊत
महाराष्ट्र सरकारचा पूर्ण प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकारनेसुद्धा जास्तीत जास्त मदत महाराष्ट्राला करावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले. तसेच मुंबई शहरात अनेक धनिक लोक आहेत, त्यांनीसुद्धा जास्त लक्ष महाराष्ट्राकडे द्यावे, असंही ते म्हणाले
महाराष्ट्रातील 11 जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती आहे. लाखो लोक बेघर झालेले आहेत, मोठे नुकसान झाले. अनेकांचे जीव गेले आणि त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झालेत त्या सगळ्यांना आता सावरायचं आहे. महाराष्ट्र सरकारचा पूर्ण प्रयत्न करत आहे, पण केंद्र सरकारनेसुद्धा जास्तीत जास्त मदत महाराष्ट्राला करावी लागेल, असं संजय राऊत म्हणाले. तसेच मुंबई शहरात अनेक धनिक लोक आहेत, त्यांनीसुद्धा जास्त लक्ष महाराष्ट्राकडे द्यावे. महाड, सातारा, सांगली, कोल्हापूर येथे गावं उद्ध्वस्त झाली आहेत. त्या गावांना आता पुन्हा एकदा उभं करावं लागेल. सरकार आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करत आहे, असा दावा संजय राऊत यांनी केला.