संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी
पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. संजय राऊत यांच्यामुळेच प्रवीण राऊत हे म्हाडाच्या पत्रा चाळ पुनर्विकासाची परवानगी मिळवू शकले. या बदल्यात संजय राऊत यांना मोठी रोख रक्कम मिळाल्याच्या दिशेने आता ईडीने तपासाची दिशा निश्चित केली आहे. त्यामुळे राऊत यांची कोठडी वाढवून मिळावी अशी मागणी आज न्यायालयात करण्यात आली. त्यामुळे राऊत यांचा ईडी कोठडीतील मुक्काम आणखी चार दिवस वाढला आहे.