गोव्याच्या राजकारणाचा चेहरा बेसूर झाला : Sanjay Raut
भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्यावर बलात्कारापासून अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत, असे वक्तव्य राऊतांनी केले आहे. अशा गुन्हेगार उमेदवाराला विरोध करण्यासाठी उत्पल पर्रिकर उभे आहेत. राजकारणाचा चेहरा बेसुर झाला आहे. त्यामुळे तो बदलायचा असेल तर प्रामाणिक उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे आणि त्याची सुरूवात पणजीपासून झाले पाहिजे असे आवाहन राऊतांनी केले आहे.
पणजी : पणजीत शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) उमेदवार मागे घेत असल्याची घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच भाजपवर (Bjp) पुन्हा निशाणा साधला आहे. गोव्यात उत्पल पर्रीकरांना (Utpal Parrikar) खंबीर पाठिंबा देणार आहे, अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे. त्यानंतर त्यांनी भाजपवर निशाणा साधताना ही लढाई कार्यकर्ता आणि माफिया यांच्यातील आहे, अशी घणाघाती टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीने ज्यांना उमेदवारी दिली आहे, त्यांच्यावर बलात्कारापासून अपहरण असे अनेक गुन्हे दाखल आहेत, असे वक्तव्य राऊतांनी केले आहे. अशा गुन्हेगार उमेदवाराला विरोध करण्यासाठी उत्पल पर्रिकर उभे आहेत. राजकारणाचा चेहरा बेसुर झाला आहे. त्यामुळे तो बदलायचा असेल तर प्रामाणिक उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे आणि त्याची सुरूवात पणजीपासून झाले पाहिजे असे आवाहन राऊतांनी केले आहे.