Legislative Council : शिवसेनेकडून दोन नावं निश्चित, सचिन अहिर, आमशा पाडवी यांच्या नावावर शिकामोर्तब, सूत्रांची माहिती
राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींना वेग आलेला असतानाच आता विधान परिषदेच्या उमेदवारांचीही चर्चा सुरु झालीय.
मुंबई : आताची सर्वात मोठी बातमी. शिवसेनेकडून विधानपरिषदेसाठी (Legislative Council) कट्टर शिवसैनिक आमशा पाडवी यांना उमेदवारी दिली आहे. धडगाव-अक्कलकुवा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली पण काँग्रेसचे नेते केसी पाडवी यांच्याकडून त्यांचा 2 हजार 96 मतांनी पराभव झाला. राज्यसभा निवडणुकीच्या घडामोडींना वेग आलेला असतानाच आता विधान परिषदेच्या उमेदवारांचीही चर्चा सुरु झालीय. शिवसेनेकडून दोन नावं निश्चित झाली असल्याचं समोर आलंय. शिवसेनेकडून विधानपरिषदेवर सचिन अहिर (Sachin Ahir) आणि आमशा पाडवी (Amsha Padvi) यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. अशी माहिती सुत्रांनी दिलीय. सध्या शिवसेना मोठ्या चेहऱ्यांपेक्षा कट्टर आणि स्थानिक नेत्यांना उमेदवारी देण्यावर भर देत असल्याचं दिसतंय. त्यातूनच राज्यसभेसाठी संजय पवार आणि विधानपरिषदेसाठी आता आमशा पाडवी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.