‘राहुल गांधी हे चेष्टेचा विषय म्हणून त्यांचं नाव पप्पू’, कुणी सोडलं टीकास्त्र
VIDEO | खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी निषेध व्यक्त करत केला हल्लाबोल
ठाणे : खासदारकी रद्द झाल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले, मला तुरुंगात टाका. माझी खासदारकी रद्द करा. कायमस्वरुपीही माझं लोकसभेचं सदस्यत्व घालवलं तरी मी बोलतच राहणार, मी माफी मागणार नाही. कारण मी गांधी आहे. सावरकर नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी भाष्य केले आहे. राहुल गांधी हे चक्रम आहेत राहुल गांधी हे चेष्टेचा विषय झालेला आहे .त्यांना पप्पू हे नाव पडलेला आहे .ते अशाच पद्धतीचे वक्तव्य करत असतात ते दुसरं काय करणार?, अशी टीका करत नरेश म्हस्के यांनी सवाल उपस्थित केला आहे. कायम वीर सावरकरांविरोधात बोलणं सावरकरांबाबत ते बोलत आहेत, त्यांची योग्यता आहे का? ज्या माणसाने आयुष्यभर कारावास भोगला त्या माणसाबद्दल असे बोलणे चुकीचा आहे, असे म्हणत नरेश म्हस्के यांनी निषेध व्यक्त केला आहे.