शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण तर शिंदेंकडे गेलं आता ठाकरेंकडून ‘मशाल’ही जाणार? हाती काय लागणार?
राहुल नार्वेकर यांनी काल निकाल जाहीर केला. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला कारण या निकालाने एकनाथ शिंदे यांचा गट हा खरी शिवसेना असल्याचे सिद्ध झाले आहे, त्यामुळे त्यांच्या गटाला अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे गटाला दुसरा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
मुंबई, ११ जानेवारी २०२४ : शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल निकाल जाहीर केला. या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला कारण या निकालाने एकनाथ शिंदे यांचा गट हा खरी शिवसेना असल्याचे सिद्ध झाले आहे, त्यामुळे त्यांच्या गटाला अधिकृतरित्या मान्यता मिळाली आहे. यानंतर आता उद्धव ठाकरे गटाला दुसरा मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा पुन्हा दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे. मशाल चिन्ह मिळवण्यासाठी अटी पूर्ण केल्या असल्याचा दावा समता पक्षाने केला आहे. निवडणूक आयोगानेच उद्धव ठाकरे यांना मशाल चिन्ह दिलं असलं तरी त्यावर दुसऱ्या पक्षानं दावा केल्यानं आता मशाल चिन्ह उद्धव ठाकरे यांच्या हातून जाणार की राहणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.