ठाकरे-फडणवीस भेटीवर संजय राऊत म्हणाले, ‘…त्या न भरून येणाऱ्या जखमा’

| Updated on: Mar 23, 2023 | 6:12 PM

VIDEO | भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज विधानभवनात भेट, या भेटीनंतर आता संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया...

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी कोणत्या क्षणी राजकीय भूकंप होईल, याबाबत काहीच सांगता येत नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अनेक अनपेक्षित घटना घडल्याचे पाहायला मिळत आहेत. दरम्यान, अशातच आज एक वेगळी आणि आश्चर्यकारक घटना घडली. उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची आज अनेक महिन्यांनी भेट झाली. याच भेटीवर ठाकरे गटाकडून पहिली प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. ‘उद्धव ठाकरेंनी वारंवार विधानसभेत जायला हवं. म्हणजे एकत्र भेटतील, बोलतील, चर्चा करतील. महाराष्ट्राची ती संस्कृती आहे. विरोध राजकीय असतो, व्यक्तीगत नसतो. कटुता संपवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. निवडणुकीत तुमचा पराभव करु. विचारांची लढाई विचारांनी करु. पण सुडाने, बदल्याच्या भावनेने कारवाई करणार असाल आणि तशी भाषा करणार असाल तर मग आम्हाला तशाच भाषेत उत्तर द्यावं लागेल’, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Published on: Mar 23, 2023 06:12 PM
बिरोबा महाराज यात्रेतील पारंपारिक दशावतारी खेळ, बघा व्हिडीओ
अमोल मिटकरी यांनी राज ठाकरे यांना दिल्या थेट भावी मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा!