अनेक जण शिंदेंच्या संपर्कात, 6 जूननंतर…, संजय शिरसाट यांच्या दाव्यानं चर्चांना उधाण

| Updated on: May 26, 2024 | 4:34 PM

येत्या 6 जूननंतर शिंदे गटात इनकमिंग सुरु होणार असल्याचा मोठा दावा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे.. इतकेच नाहीतर अनेक जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून योग्य वेळी एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असंही संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे.

येत्या 6 जूननंतर शिंदे गटात इनकमिंग सुरु होणार असल्याचा मोठा दावा शिंदे गटाच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केला आहे. इतकंच नाहीतर अनेक जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून योग्य वेळी एकनाथ शिंदे निर्णय घेतील, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे शरद पवार गटात हुकूमशाही सुरू असून या हुकूमशाहीला कंटाळलेले बहुतेक आमदार अजित पवार यांच्या संपर्कात असल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी केला आहे. .’6 जूननंतर शिंदे गटात इनकमिंग सुरु होणार आहे. आमचं बोलणं सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या रणनितीनुसार ते योग्य वेळी योग्य निर्णय घेतील तर शरद पवार गटाला अनेक लोकं कंटाळलेले आहेत. त्यातील मीपणाला लोकं कंटाळले आहेत. त्यामुळे बहुतेक आमदार हे अजित पवार यांच्या संपर्कात आहेत’, असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलं आहे.

Published on: May 26, 2024 04:34 PM
‘शिंदेंनी हेलिकॉप्टरनेच खूप पैसे वाटले, उदय सामंत फक्त पैसे वाटायला होते’, कुणी केला गंभीर आरोप?
योगी को बचाना है, तो मोदी को… ‘सामना’च्या ‘रोखठोक’मधून संजय राऊतांनी काय केले मोठे दावे?