तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलणं टाळलं, आधी नको ते बोलून गेले अन् आता…?
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसंदर्भात एक विधान केलं अन् ते चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तानाजी सावंत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महायुतीत वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.
“अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आपले आयुष्यभर पटले नाही. आता आपण मांडीला मांडी लावून बसलो आहोत परंतु बाहेर आल्यावर उलट्या होतात,”, असे तानाजी सावंत यांनी म्हटले. तानाजी सावंत यांनी भरसभेत राष्ट्रवादीबाबत केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. तानाजी सावंत यांनी भर सभेत केलेल्या वक्तव्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सत्तेतून बाहेर पडण्याची विनंती वजा आवाहन राष्ट्रवादीच्या दादा गटाकडून केले जात आहे. यानंतर तानाजी सावंत धाराशिवच्या वाशी तालुक्यातील सारोळा मांडवा येथे असता माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तानाजी सावंत यांनी बोलणं टाळल्याचे पाहायला मिळाले. तानाजी सावंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार दिला. आणि म्हणाले, “माझा इतर वेळ कमी असतो. मला भेटू दे लोकांना”, असं म्हणत तानाजी सावंत हे यानंतर पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ…