शिवसेनेचे आजी, माजी आमदार पती-पत्नी थोडक्यात बचावले, कुठं झाला भीषण अपघात
VIDEO | शिंदे गटाच्या शिवसेनेचे आजी, माजी आमदार पती-पत्नी यांच्या कारला भीषण अपघात
जळगाव : शिवसेना शिंदे गटाचे आजी माजी आमदार पती पत्नी थोडक्यात बचावल्याचे समोर आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना काल घडलीय. जळगाव तालुक्यातील करंज गावाजवळ रात्रीच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. वाळूच्या भरधाव डंपरने आमदार सोनवणे यांच्या कारला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात आमदार लता सोनवणे बालंबाल बचावल्या आहेत. आमदार सोनवणे यांचे पती माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांना मुका मार लागला आहे. कारमध्ये आमदार सोनवणे यांच्यासोबत पती चंद्रकांत सोनवणे बॉडीगार्ड आणि चालक होता. या वेळी हा अपघात झाला. या अपघातानंतर वाळूच्या डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. डंपरने समोरून धडक दिल्याने आमदार सोनवणे यांच्या कारच मोठ नुकसान झालंय. या घटनेच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यातील अवैध वाळू वाहतुकीचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे.