Ramdas Aathwale | शिवसेनेने भाजपसोबत येण्याचा विचार करावा, आठवलेंचा शिवेसनेला सल्ला
2024 साली महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार असून शिवसेनेने अजूनही भाजपा सोबत यावे असा सल्ला देखील आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे. शिर्डी येथे आयोजीत वयोश्री योजनेच्या साहित्य वाटप प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले यांनी हे वक्तव्य केलंय.
अहमदनगर : भाजपला आव्हान दिलं तर सुपडा साफ होईल अस थेट आव्हान केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला दिलंय. अजूनही वेळ गेलेली नाही. चार राज्यात जनतेने भाजपाच्या बाजूने कौल दिलाय. 2024 साली महाराष्ट्रात भाजपाची सत्ता येणार असून शिवसेनेने अजूनही भाजपा सोबत यावे असा सल्ला देखील आठवले यांनी शिवसेनेला दिला आहे. शिर्डी येथे आयोजीत वयोश्री योजनेच्या साहित्य वाटप प्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले यांनी हे वक्तव्य केलंय.