भर पत्रकार परिषदेत डुलकी, गोऱ्हे यांनी जरा उठा… म्हणताच शिवसेनेचे प्रवक्ते खडबडून जागे

| Updated on: Apr 22, 2024 | 4:50 PM

निवडणुकीसाठी राजकीय नेते मंडळी दिवस रात्र आपल्या उमेदवाराच्या मतदारसंघात प्रचारसभा घेताना दिसताय. ऊन, वारा कशाचीही फिकीर न करता फुल्ल एनर्जीने हे नेते मंडळी जोरदार प्रचार सभा घेताना दिसताय. असं असलं तरी थकवा तर जाणवतच असणार यात शंका नाही....

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पहिला टप्पा पार पडला. आता पुढच्या टप्प्यांच्या निवडणुकीसाठी राजकीय नेते मंडळी दिवस रात्र आपल्या उमेदवाराच्या मतदारसंघात प्रचारसभा घेताना दिसताय. ऊन, वारा कशाचीही फिकीर न करता फुल्ल एनर्जीने हे नेते मंडळी जोरदार प्रचार सभा घेताना दिसताय. असं असलं तरी थकवा तर जाणवतच असणार यात शंका नाही…. अशातच आज निलम गोऱ्हे यांची पत्रकार परिषद सुरू असताना शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे यांचा डोळा लागला असल्याचे पाहायला मिळाले. पत्रकार परिषद संपताच चक्क झोपलेल्या राजू वाघमारेंना निलम गोऱ्हे उठा जरा… असं म्हणाल्या. यानंतर झोपलेले राजू वाघमारे हे खडबडून जागे झाल्याचे पाहायला मिळाले. शिर्डी लोकसभा मतदार संघाचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निलम गोऱ्हे या शिर्डीमध्ये होत्या. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Apr 22, 2024 04:50 PM
आता उशीर झालाय, असं ठाकरेंना दिल्लीतून सांगण्यात आलं; मुख्यमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट
माफी मागत शरद पवार म्हणाले, ‘ती’ चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा नेमका कुणावर?