‘संजय राऊत हा सैराट सारखा पिक्चर काढणार, त्याचा अंत सुसाईडमध्ये होणार’, शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
VIDEO | संजय राऊत यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर संजय शिरसाट यांचा पलटवार
मुंबई : डायरी ऑफ महाराष्ट्र खोका हा सिनेमा काढणार असल्याचे म्हणत संजय राऊत यांनी शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे. खोका स्टोरी हा एक ऐतिहासिक चित्रपट बनणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं. राऊतांच्या या वक्तव्यावर शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी ‘द डायरी ऑफ महाराष्ट्र खोके’ सिनेमा काढण्याची घोषणा केली. त्यावर संजय शिरसाट यांनी संजय राऊत हा सैराट सारखा पिक्चर काढणार असं म्हटलं आहे. “राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे जे प्रेम संबंध चालू आहेत, त्याचा अंत सुसाईडमध्ये होणार. त्याच्यावर त्यांनी पिक्चर काढायला पाहिजे होता” असं संजय शिरसाट म्हणाले. यासह “18 खासदारांपैकी 13 खासदार निघून गेले. पाच राहिले, तरी दावा 19 चा करतात हे मूर्खपणाच लक्षण आहे ते संजय राऊतमध्ये आहे” असं संजय शिरसाट यांनी म्हणाले.
Published on: May 26, 2023 02:28 PM